भोकर आणि लगळुद येथे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी
भोकर| वीरशिरोमणी राष्ट्रवीर महाराणा प्रतापसिंह यांची जयंती भोकर शहरात आणि तालुक्यातील लगळुद येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील नांदेड -म्हैसा वळण रस्त्यावरील महाराणा प्रतापसिंह चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास नगरसेवक साईप्रसाद जटलावार, नगराध्यक्ष प्रतिनिधी ॲड. विशाल दंडवे, अशोक निळकंठे,नगरसेवक प्रतिनिधी सिद्धेश्वर पिटलेवाड, मनोजसिंह चौहान, दिनेश तिवारी, गोविंदसिंह चौहान,करणी सेनेचे भोकर तालुकाध्यक्ष विक्रमसिंह चौहान,अतुल अन्नावार, दत्ता शिरळवाड,श्यामसिंह रघुवंशी शुभमसिंह रघुवंशी, आदर्शसिंह चंदेल, किशोर डोमपल्ले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
तर लगळुद येथे सकाळी ध्वजारोहण करून महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे ग्रा...
