Tag: भाग ७

 अमरनाथ गुहेतून – भाग ७  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग ७  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
“भोलेनाथाच्या दरबारात… श्रद्धा, साहस आणि समाधानाचा दिवस!” अमरनाथ यात्रेचा सर्वांत महत्त्वाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा दिवस अखेर उजाडला. खरे तर “उजाडला” म्हणणेही चुकीचे ठरेल, कारण हा दिवस सुरू झाला तो मध्यरात्रीच! दिवसभराचा प्रवास, थंडी, उंच पर्वत, विरळ ऑक्सिजन आणि भोलेनाथाच्या दर्शनाची ओढ… या सगळ्यांचे अनोखे मिश्रण मनात होते. रात्री सर्वांना सूचना दिल्या होत्या की, बरोबर दोन वाजता आंघोळ करून तयार राहायचे. पण यात्रेकरूंचा उत्साह एवढा अफाट होता की दीड वाजताच सर्वजण तयार होऊन उभे होते. कोणाच्या चेहऱ्यावर झोप नव्हती; उलट प्रत्येकाच्या डोळ्यांत फक्त एकच स्वप्न होते—“आज भोलेनाथाचे प्रत्यक्ष दर्शन होणार!” पूजा टेन्ट हाऊससमोर आधीच घोडेवाले आणि डोलीवाले आपल्या यात्रेकरूंची वाट पाहत उभे होते. ज्यांनी डोलीची व्यवस्था केली होती, त्यांना काळजीपूर्वक डोलीत बसवण्यात आले. घोड्यावर जाणाऱ्यांना मात्र जव...
error: Content is protected !!