बाळासाहेबांचे विचार अंगार; फुंकर मारली की शिवसेना पुन्हा धगधगेल!
शिंदे गटातील पदाधिकारी, सरपंच-उपसरपंचांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश; देगलूर-बिलोलीत संघटनात्मक बैठकीत पोतदारांचा एल्गार
देगलूर, गंगाधर मठवाले| शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे अंगार आणि निखाऱ्यासारखे आहेत. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेला शिवसैनिक आजही लढण्याच्या भूमिकेत आहे. या निखाऱ्यावर केवळ फुंकर मारण्याची गरज असून शिवसेना पुन्हा धगधगेल, असा दावा नांदेड लोकसभा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी केला.
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी हॉटेल स्वाद ओंकार रेसिडेन्सी येथे झाली. यावेळी पोतदार बोलत होते.
यावेळी शिंदे शिवसेनेतील पदाधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. नव्या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य स...
