Tag: प्रवाशांनी नोंद घ्यावी

नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस 30 एप्रिलला रद्द; प्रवाशांनी नोंद घ्यावी

नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस 30 एप्रिलला रद्द; प्रवाशांनी नोंद घ्यावी

महाराष्ट्र
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गाडी क्रमांक 20705 हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेक (train set) उपलब्ध नसल्यामुळे ही गाडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संबंधित मार्गावरील प्रवाशांना गैरसोय होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन यानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान, झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे....
error: Content is protected !!