पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची लातूर जिल्ह्यात जुगार व मटका अड्ड्यांवर धडक कारवाई
15 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल; 5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
लातूर | नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जुगार व मटका अड्ड्यांवर धाडी टाकून एकूण 15 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे 5 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 5 जून 2026 रोजी निलंगा शहरातील शिवाजी चौक परिसरात सुरू असलेल्या दोन मटका बुकी अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 24 हजार 320 रुपयांची रोकड, 43 हजार रुपयांचे सहा मोबाईल फोन आणि 48 हजार 600 रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 1 लाख 15 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्...
