Tag: पोलिसांची तत्पर कारवाई

कुंडलवाडीत धारदार तलवारीसह युवक जेरबंद; पोलिसांची तत्पर कारवाई

कुंडलवाडीत धारदार तलवारीसह युवक जेरबंद; पोलिसांची तत्पर कारवाई

क्राइम
नांदेड/बिलोली| कुंडलवाडी (जि. नांदेड) येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत कुंडलवाडी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत प्रतिबंधित धारदार तलवारीसह एका युवकाला जेरबंद केले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी महालक्ष्मी मंदिर परिसरात एक संशयित इसम धारदार शस्त्रासह फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. पंचांच्या उपस्थितीत संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 31 इंच लांबीची लोखंडी तलवार, तिची म्यान आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या तलवारीची किंमत सुमारे 6 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अटक करण्यात आलेला आरोपी हर्ष उर्फ हर्षसिंग हाणमंत इंगळे (वय 19, रा. इंद...
error: Content is protected !!