पोटा येथील अंगणवाडीची दयनीय अवस्था; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथील आबादी परिसरातील अंगणवाडी इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, चिमुकल्या बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीच्या जमिनीवर ठिकठिकाणी मोठी छिद्रे पडली असून, त्यातून घुशी माती बाहेर काढत असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे.
बालके बसतात त्या ठिकाणीही जमिनीला भगदाडे पडली असून, पावसाळ्यात या छिद्रांमध्ये विंचू, साप तसेच इतर विषारी व सरपटणारे प्राणी लपण्याची शक्यता असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक पालकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने अंगणवाडी इमारतीची पाहणी करून जमिनीवर फरशी बसविणे तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. चिमुकल्या बालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने त्वरित उपाय...

