Tag: परभणी

RPF चा धाडसी पराक्रम; परभणीत प्रवाशाचा जीव वाचवला, सेलूत हरवलेली पर्स परत

RPF चा धाडसी पराक्रम; परभणीत प्रवाशाचा जीव वाचवला, सेलूत हरवलेली पर्स परत

महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) जवानांनी आपल्या तत्परतेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा उत्कृष्ट नमुना सादर करत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रवाशांचा जीव व मालमत्ता वाचवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. परभणी रेल्वे स्थानकावर ५ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेत, गाडी क्रमांक १२७८८ नागरसोल–नरसापूर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत असताना एक प्रवासी गाडीत चढताना अचानक घसरून प्लॅटफॉर्म आणि गाडीमधील धोकादायक फटीत अडकला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हेड कॉन्स्टेबल मोगरे पद्माकर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत त्या प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. सदर प्रवासी शेख मोहम्मद हे परभणी ते नांदेड प्रवास करत होते. दरम्यान, ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत दुसऱ्या घटनेत सेलू रेल्वे स्थानकावर हरवलेली पर्स परत मिळवून देण्यात...
परभणी रेल्वे स्थानकावर तोडफोड व कर्मचाऱ्यावर हल्ला; आरोपी फरार

परभणी रेल्वे स्थानकावर तोडफोड व कर्मचाऱ्यावर हल्ला; आरोपी फरार

क्राइम
परभणी (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत परभणी रेल्वे स्थानकावर आज (५ एप्रिल) सकाळी तोडफोड व मारहाणीची धक्कादायक घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वरील लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक तोडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस करण्यात आली, तसेच देखभाल कर्मचाऱ्यावर हल्लाही करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने लिफ्टमध्ये घुसून दरवाज्याचा लॉक तोडत सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब ड्युटीवर असलेल्या इलेक्ट्रिकल मेंटेनन्स कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीने आक्रमक होत कर्मचाऱ्याशी शिवीगाळ करत त्याला मारहाण केली. परिस्थिती हाताळताना संबंधित कर्मचाऱ्याने आरोपीचा फोटो काढण्यात यश मिळवले आणि तत्काळ इतर कर्मचारी तसेच रेल्वे संरक्षण दल यांना माहिती दिली. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच आरोपी ...
नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

क्राइम
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या १५ दिवसांत ८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ७१ गुन्हे दाखल करून तब्बल १ कोटी १९ लाख ९५ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात कडक कारवाई करण्यात आली. जिल्हानिहाय कारवाई : नांदेड : २८ गुन्हे, ३१ आरोपी अटक, ₹३१.७० लाखांचा मुद्देमाल परभणी : १३ गुन्हे, १८ आरोपी अटक, ₹९.२० लाखांचा मुद्देमाल हिंगोली : ११ गुन्हे, ७ आरोपी अटक, ₹८.५७ लाखांचा मुद्देमाल लातूर : १९ गुन्हे, २५ आरोपी अटक, ₹७०.४७ लाखांच...
error: Content is protected !!