Tag: नांदेड-वारंगा फाटा

नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर आता ‘डिजिटल’ पाळत!

नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर आता ‘डिजिटल’ पाळत!

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड ते वारंगा फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. या मार्गावर अत्याधुनिक 'अॅडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पामुळे महामार्गावरील अपघातांना आळा बसण्यासोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर डिजिटल पद्धतीने वचक बसणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मात्र, सतत गंभीर अपघात होत असलेल्या या महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान खा. चव्हाण यांनी नांदेड ते पार्डी मक्ता या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ...
error: Content is protected !!