Tag: नांदेड महापालिकेचा पुढाकार

नव्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी नांदेड महापालिकेचा पुढाकार

नव्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी नांदेड महापालिकेचा पुढाकार

महाराष्ट्र
नांदेड| मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणपणाने लढलेल्या असंख्य योद्ध्यांच्या शौर्यकथा आणि त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. या ऐतिहासिक लढ्याची खरी ओळख आजच्या तरुणांना व्हावी, यासाठी नांदेड वाघाळा महानगरपालिका स्वतंत्र आणि व्यापक कार्यक्रम राबविणार असल्याची ठाम घोषणा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी केली. सीमाभागातील समन्वयकांशी आयोजित संवाद कार्यक्रमात बोलताना डोईफोडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ एक इतिहासाचा भाग नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्याचा पाया आहे. मात्र दुर्दैवाने आजच्या नव्या पिढीला या संग्रामाची सखोल माहिती नाही. हा लढा कसा लढला गेला, किती बलिदान दिले गेले आणि आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते कोणाच्या कष्टामुळे मिळाले—याची जाणीव निर्माण होणे अत्यावश्यक आहे.” ते पुढे म्हणाले की, दरवर्षी 17 सप्टेंबरला...
error: Content is protected !!