Tag: नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारिण्या बरखास्त; नव्या गठनाची प्रक्रिया लवकरच

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारिण्या बरखास्त; नव्या गठनाची प्रक्रिया लवकरच

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील बहुतेक तालुका कार्यकारिण्या बरखास्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. माहूर आणि अर्धापूर तालुका कार्यकारिणी वगळता उर्वरित सर्व तालुक्यांतील कार्यकारिण्यांना बरखास्त करण्यात आले असून, त्यांचे नव्याने गठन करण्यात येणार आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मान्यतेने तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे आणि कार्याध्यक्ष अनिल कसबे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे यांनी दिली. जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवले जातात. मात्र, अर्धापूर आणि माहूर वगळता इतर तालुका कार्यकारिण्यांची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने गठित झालेल्या अर्धापूर व माहूर कार्यकारिणी या निर...
error: Content is protected !!