‘नांएसो’ अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील यांचा प्राध्यापकांकडून सत्कार
नांदेड| हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सीए डॉ. प्रवीण पाटील यांचा पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त प्राध्यापकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पीपल्स व सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात डॉ. पाटील यांना शाल, श्रीफळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भेट देऊन गौरविण्यात आले.
खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी यापूर्वीच डॉ. प्रवीण पाटील यांच्याकडे होती. नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या इतिहासात संस्थापक स्वामी रामानंद तीर्थ यांनी १९५० ते १९७२ या काळात अध्यक्षपद भूषविले, त्यानंतर पद्मविभूषण गोविंदभ...
