नसरापूर घटनेतील चिमुरडीला मसापची श्रद्धांजली; आरोपीस कठोर शिक्षेची मागणी
नांदेड| नसरापूर येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेचा निषेध करत पीडित चिमुरडीला मराठवाडा साहित्य परिषद (मराठवाडा साहित्य परिषद) शाखा नांदेडच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून हा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी उपस्थितांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य तथा मसापचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य देवीदास फुलारी, शाखा उपाध्यक्ष श्रीनिवास मस्के, कार्यवाह प्रा. महेश मोरे, कोषाध्यक्ष व्यंकटेश चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते. समाजमन हेलावून टाकणाऱ्या या ...
