बंदी घातलेल्या गुटख्यावर वजिराबाद पोलिसांचा धडक छापा; दोन विक्रेत्यांना बेड्या
नांदेड | नांदेड शहरात बंदी घातलेल्या गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात वजिराबाद पोलिसांनी प्रभावी कारवाई करत दोन विक्रेत्यांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून ₹31,292 किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांना जेल रोड परिसरातील भोला पान शॉपमध्ये बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकत दुकानाची झडती घेतली.
या कारवाईत आकाश अनिल शेटे (२४) व अविनाश अनिल शेटे (२२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान गुटखा, सुगंधित तंबाखू, चुना तसेच मिश्रित खर्रा असा एकूण ₹31,292 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 351/2026 नोंदवून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, ...
