सोनारी फाट्यावर भरधाव चारचाकीचा कहर; दोन दुचाकींना उडवले!
एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी; स्पीड ब्रेकरच्या मागणीकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष
हिमायतनगर : अनिल मादसवार| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा येथे भरधाव चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याची भीषण घटना शनिवार, दि. २५ जुलै रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच २६ सीपी ८८६० ने सोनारी फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत टीएस १८ जी १८१७ आणि एमएच २६ बीएस ५२६९ क्रमांकाच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात सोनारी येथील शेख जिकरान शेख सिराज आणि शेख सोहेल शेख जहीर हे दोघे गंभीर जखमी झाले. ...
