Tag: दत्ता हेंद्रे

हिमायतनगर येथील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक दत्ता हेंद्रे यांचे निधन

हिमायतनगर येथील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक दत्ता हेंद्रे यांचे निधन

सामाजिक
हिमायतनगर| हिमायतनगर शहरातील माळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते दत्ता हेंद्रे (ढेकळे) यांचे गुरुवार दि. 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शहरात व समाजबांधवांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दत्ता हेंद्रे यांनी सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने माळी समाजासह हिमायतनगर शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगी, नातू, पंतू असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवार दि. 29 मे रोजी दुपारी 12 वाजता हिंदू स्मशान भूमी, लाकडोबा चौक, हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे....
error: Content is protected !!