सहस्त्रकुंड धबधबा त्रिधारांनी ओथंबून वाहतोय!
विदर्भ–मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील निसर्गरम्य सहस्त्रकुंड धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने कोसळत आहे. यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून धबधब्याचे त्रिधारांनी कोसळणारे विहंगम दृश्य पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.
हे मनोहारी दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. 📸 छायाचित्र : अनिल मादसवार
Oplus_16908288...
