तिरुपती लाडू देशात दुसरा, तर महाराष्ट्रातील माहूरच्या प्रसिद्ध तांबुल मानांकन मिळालेला पहिलाच ‘प्रसाद
'जीआय टॅग'; इतिहास, संस्कृती व परंपरेची जपणूक '
मंदिरात दररोज महाप्रसादाचे होतेय वाटप...
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील 'विडा तांबुल' या प्रसादाला अखेर बहुमानाचा भौगोलिक मानांकन ('जीआय टॅग') मिळाला आहे. केंद्र सरकारच्या चेन्नई येथील 'जिओग्राफिकल इंडिकेशन्स' रजिस्ट्रीने याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र प्रसिद्ध केले आहे. भारतात यापूर्वी केवळ तिरुपतीच्या लाडूला प्रसादाच्या स्वरूपात 'जीआय टॅग' मिळाला होता. त्यानंतर हा बहुमान मिळवणारा माहूरचा तांबुल हा देशातील दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रसाद ठरला आहे.
माहूरगड श्री रेणुका मातेचा पानाच विडा तांबुल हा मुख्यप्रसाद आहे. पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात.
ज्या ठिकाणी देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्...
