लोह्यात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांब रांगा; जानापुरीत गॅस सिलेंडरसाठी गर्दी
लोहा| जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत असतानाही अफवांमुळे लोहा शहरात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंधनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
दुचाकी, चारचाकी, क्रेन, जेसीबी, हायवा आणि इतर वाहनांनी सकाळपासूनच पेट्रोलपंपांवर रांगा लावल्या होत्या. इंधन तुटवडा होईल या भीतीपोटी अनेकांनी “टँक फुल” करण्याकडे कल दर्शविला.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तरीही काही भागात भीतीचे वातावरण असल्याचे दिसून आले.
जानापुरीत गॅस सिलेंडरसाठी झुंबड
दरम्यान, तालुक्यातील जानापुरी येथे गॅस गोडाऊनसमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी उन्हाता...
