विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तात्काळ द्या नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची तहसीलदारांकडे मागणी
बिलोली | दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तसेच विविध शैक्षणिक प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची तातडीची आवश्यकता भासत आहे. मात्र तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून विद्यार्थी व पालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
ऑनलाइन प्रक्रियेमधील तांत्रिक अडचणी, विलंब तसेच अपुरी कर्मचारी व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षण...
