नांदेड जिल्ह्यासाठी ७ मे रोजी ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
नांदेड (प्रतिनिधी) प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ७ मे २०२६ रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
संभाव्य नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
विजेच्या गडगडाटाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळा
मोकळ्या जागेत अडकल्यास सखल भागात बसून डोके गुडघ्यात घ्या
शक्य असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या
बाल्कनी, छत किंवा घराबाहेर उभे राहू नका
घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करा
विजेचे खांब, तारांचे कुंपण व लोखंडी वस्तूंपासून दूर राहा
पाण्यात उभे असल्यास ता...
