नांदेड जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने निलंबित ; दोन परवाने कायमस्वरूपी रद्द
कृषी विभागाची धडक कारवाई
नांदेड| नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारी, प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि चौकशीअंती कृषी विभाग यांनी कठोर कारवाई करत नायगाव तालुक्यातील सात कृषी सेवा केंद्रांचे खत परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहेत.
निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दशरथ कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत अग्रो सर्व्हिस सेंटर, गजानन कृषी सेवा केंद्र, हनुमान कृषी सेवा केंद्र, मातोश्री ॲग्रो एजन्सी आणि शिवकृपा कृषी सेवा केंद्र, नायगाव यांचा समावेश आहे.
याशिवाय मे. वर्षा ॲग्रो ट्रेडर्स, खांबाळा ता. मुदखेड, मे. व्यंकटरमणा कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता. कंधार आणि मे. तिरुमला कृषि सेवा केंद्र, कुरुळा ता. कंधार यांच्या परवान्यांवरही सुनावणीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच मे. शिवकृपा कृषि विकास केंद्र, माळकौठा ता. मुदखेड आणि व्यंकटेश कृषि भांडार, नवीन मों...
