Tag: जवळगाव कमानीजवळ ठप्प

डिझेल संपल्याने एसटी बस जवळगाव कमानीजवळ ठप्प; प्रवाशांचा संताप

डिझेल संपल्याने एसटी बस जवळगाव कमानीजवळ ठप्प; प्रवाशांचा संताप

महाराष्ट्र
हिमायतनगर | हदगाव बस डेपोतून हिमायतनगरकडे निघालेली एसटी बस डिझेल संपल्यामुळे जवळगाव कमानीजवळ गेल्या एक तासापासून बंद पडल्याची घटना समोर आली आहे. अचानक बस थांबल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव बस डेपोतून सुटलेली बस हिमायतनगरकडे जात असताना जवळगाव कमानी परिसरात आली असता बसमधील डिझेल संपले. त्यामुळे बस रस्त्यातच उभी राहिली. बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांसह अनेक प्रवासी प्रवास करत होते. सुमारे एक तास उलटल्यानंतरही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याने प्रवाशांना उन्हात आणि उकाड्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेत पुढील प्रवास सुरू केला, तर अनेकजण प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा करत बसस्थानक प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत. ...
error: Content is protected !!