छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर RPF ची धडाकेबाज कारवाई
हरवलेला मोबाईल परत, संशयितांना अटक
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) नांदेड विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) ‘ऑपरेशन अमानत’ आणि ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर (CPSN) रेल्वे स्थानकावर तत्पर कारवाई करत प्रवाशांच्या सुरक्षिततेप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत ११ एप्रिल रोजी रेल मदत (Rail Madad) द्वारे प्राप्त तक्रारीनुसार, मुंबई ते नाशिक प्रवासादरम्यान ट्रेन क्रमांक २०७०६ मध्ये प्रवासी प्रफुल बर्धिया यांचा सुमारे ₹२८,५०० किमतीचा मोबाईल फोन हरवला होता. तक्रार मिळताच RPF कर्मचारी राकेश कुमार शर्मा (हेड कॉन्स्टेबल) आणि फूल सिंह (कॉन्स्टेबल) यांनी तत्काळ कारवाई करून संबंधित गाडीतून मोबाईल सुरक्षितरित्या जप्त केला. आवश्यक पडताळणीनंतर हा मोबाईल प्रवाशांच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत RPF च...
