नांदेड विभागात ‘डिजिटल अवेअरनेस डे’; रेल्वे स्थानकांवर कॅशलेस व्यवहारांना चालना
नांदेड (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आज “डिजिटल अवेअरनेस डे” उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विविध रेल्वे स्थानकांवर जनजागृती कार्यक्रम घेऊन प्रवाशांमध्ये डिजिटल पेमेंटबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशीम आणि आदिलाबादसह इतर स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधत डिजिटल व्यवहारांचे फायदे, सुरक्षितता आणि सोय यांची माहिती दिली. आदिलाबाद स्थानकावर केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवत डिजिटल पेमेंटचा संदेश दिला.
दरम्यान, हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर डिजिटल जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीतून तिकीट खरेदीसह रेल्वे सेवांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. वाशीम, हिंगोली डेक्कन, जालना आणि छत्रपती संभाजीनगर स्थानकांवर हेल्प डेस्क उभारून...
