हिमायतनगर येथील चम्पालालजी श्रीश्रीमाल यांचे जागृत संथारा पूर्ण
हिमायतनगर | हिमायतनगर येथील ज्येष्ठ नागरिक व श्रीश्रीमाल परिवारातील आदरणीय व्यक्तिमत्त्व श्रीमान सुश्रावक चम्पालालजी मिश्रीमलजी श्रीश्रीमाल यांचे जागृत संथारा पूर्ण झाल्याची दुःखद वार्ता समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कारासाठी चलावा (अंतिम यात्रा) सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या गणेश मंदिर परिसरातील निज निवासस्थान, हिमायतनगर येथून निघणार असल्याची माहिती परिवाराकडून देण्यात आली आहे.
दिवंगत आत्म्यास शांती लाभो व मोक्षमार्गाची उत्तम गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. ते वर्धमान मेन्स वेयर चे संचालक आशिष जैन, सुमित जैन यांचे आजोबा होते.
त्यांच्या पश्चात तख्तमल, महावीरचंद, शांतिलाल, अमरचंद, राजवर्धन, त्रिलोकचंद, आशीष, सुमित, समकित तसेच समस्त श्रीश्रीमाल परिवार असा मोठा परिवार आह...
