Tag: ग्रामीण पोलीस

अवैध अग्निशस्त्र विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा; १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध अग्निशस्त्र विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा; १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत नवीन मुझामपेठ, धनेगाव पाटी परिसरात सापळा रचून अवैध अग्निशस्त्र खरेदी-विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने २९ मार्च रोजी केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धनेगाव पाटी परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी शेख अदील शेख शकील, महमंद फरानोध्दीन महमंद फखरोध्दीन आणि आनंद उर्फ चिन्नु सरदार यादव यांची झडती घेतली. यावेळी एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, एक खंजर तसेच एक मोटारसायकल असा एकूण १.१० लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे यांच्या फिर...
error: Content is protected !!