घरकुल योजनेतील गैरप्रकारांवर संताप; वामनराव पाटील वडगावकर यांचा आंदोलनाचा इशारा
घरकुल योजनेतील गैरप्रकारांवर संताप; वामनराव पाटील वडगावकर यांचा आंदोलनाचा इशारा
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
https://www.youtube.com/watch?v=eDLKW-ztygw&t=4s
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी थेट संपर्क साधून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे, त्यांना देयके देण्यात विलंब केला जात आहे. उलट अपूर्ण काम असलेल्या लाभार्थ्यांना “टेबलाखालून व्यवह...
