गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठाचा कठोर निर्णय स्वागतार्ह – प्रा. डॉ. नितेशकुमार घुंगरवार
नांदेड | उच्च शिक्षणातील गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कठोर निर्णय समाजहिताचे असून, विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयाची निवड करताना अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. नितेशकुमार घुंगरवार यांनी व्यक्त केले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने काही महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि शिक्षणातील गुणवत्ता जपणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रा. घुंगरवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, काही शिक्षण संस्थांमध्ये आवश्यक प्रयोगशाळा, पात्र प्राध्यापक, ग्रंथालय सुविधा आणि दर्जेदार अध्यापनाचा अभाव असूनही विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाते. परिणामी अनेक विद्यार्थी पदवीधर होतात; मात्र त्यांच्याकडे आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि रोजगारक्षमतेचा अभाव राहतो. अश...
