भोकर पोलिसांची गुटखा माफियावर मोठी कारवाई; ₹1,07,550 चा मुद्देमाल जप्त
भोकर/ नांदेड| अवैध गुटखा विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत भोकर पोलिसांनी मोठी कारवाई करत ₹1,07,550 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता बटाळा चौक ते म्हैसा बायपास रोड परिसरात, डॉक्टर एकाळे यांच्या शेताजवळ काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी आमेर खान मुझफर खान (वय ३१, रा. खुदवाईनगर, देगलूर नाका, नांदेड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून फिरोजा पान मसाला (२६० पाकिटे – ₹३१,२००), AAA गुटखा (१६५ पाकिटे – ₹३१,३५०) तसेच स्प्लेंडर मोटारसायकल (MH26-BB-8320 – ₹४५,०००) असा एकूण ₹१,०७,५५० किमतीचा मुद्देमाल ज...

