Tag: खड्डेमय

असरजन नाका–वाघाळा रस्ता खड्डेमय; वर्षभरापासून नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

असरजन नाका–वाघाळा रस्ता खड्डेमय; वर्षभरापासून नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी

सामाजिक
नांदेड (प्रतिनिधी)मनपा हद्दीतील असरजन नाका ते वाघाळा दरम्यानचा रस्ता ड्रेनेज लाईनच्या कामामुळे पूर्णतः नादुरुस्त झाला असून गेल्या वर्षभरापासून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खड्डेमय रस्ता, चिखल आणि अडकणारी वाहने यामुळे परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रभाग क्रमांक २० मधील त्रिमूर्ती नगर, विठ्ठल नगर, साईबाबा नगर आणि श्रीराम नगर या भागात जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. या परिसरात पोलीस कर्मचारी, डॉक्टर तसेच सैन्यदलातील जवानांचे कुटुंबीय वास्तव्यास असूनही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ड्रेनेज काम अपूर्ण; रस्ता अधांतरी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ता मधोमध खोदण्यात आला; मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे, तर अनेक ठिकाणी कनेक्शनही देण्यात आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे ...
error: Content is protected !!