‘केरला स्टोरी पार्ट-2’ मोफत शोला नांदेडमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद
नांदेड| हिंदू मुलींमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित ‘केरला स्टोरी पार्ट-2’ या चित्रपटाच्या मोफत पाच शो उपक्रमाला नांदेडमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहाटेपासूनच मुलींची मोठी गर्दी उसळली असून, सर्व शो हाऊसफुल्ल झाल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सोमवार, दि. ३० मार्च रोजी पीव्हीआर सिनेमा येथे भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान विविध स्क्रीनवर पाच शो आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या शोचे उद्घाटन संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. चैतन्यबापू देशमुख यांनी या उपक्रमाची दखल घेत ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्म पुरस्कारासाठी राज्यपालांमार्फत शिफारस करण्याचा प्रयत्न केला जाईल, ...
