टेंभीच्या कु. सोनाली सुरमवाड हिचे दहावीत घवघवीत यश
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथील कु. सोनाली संतोष सुरमवाड हिने इयत्ता दहावी शालांत परीक्षेत 94.40 टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिने हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयात शिक्षण घेत हे उल्लेखनीय यश संपादन केले.
ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील मुलीने कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे. तिच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शिक्षणप्रेमी पालकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
कु. सोनालीच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे....
