श्वेता सीताराम कांबळे एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण; कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव
हिमायतनगर | श्वेता सीताराम कांबळे हिने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत एमबीबीएस (MBBS) पदवी पूर्ण केली आहे.
तिने विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेत परीक्षा दिली होती. या परीक्षेत यश मिळवत तिने एमबीबीएस पदवी संपादन केली आहे.
श्वेताच्या या यशाबद्दल हिमायतनगरचे पत्रकार शुद्धोधन हनवते, मामा प्रवीण हनवते, मामी तेजस्वी हनवते, वैशाली हनवते तसेच प्रणव कांबळे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
श्वेताचे वडील सामान्य शिक्षक पदावर कार्यरत असून आपल्या दोन्ही मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावे, असे त्यांचे स्वप्न होते. मुलीच्या रूपाने हे स्वप्न साकार झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच आता मुलालाही वैद्यकीय क्षेत्रात पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत ...
