Tag: कार्यक्रमांतर्गत

एसआयआर कार्यक्रमांतर्गत सिडको भागात फॉर्म वाटपाचा शुभारंभ; उपविभागीय अधिकारी डॉ. खल्लाळ व तहसीलदार वारकड यांनी घेतला आढावा

एसआयआर कार्यक्रमांतर्गत सिडको भागात फॉर्म वाटपाचा शुभारंभ; उपविभागीय अधिकारी डॉ. खल्लाळ व तहसीलदार वारकड यांनी घेतला आढावा

सामाजिक
नांदेड| भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी आवश्यक फॉर्म वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्ताने नांदेडचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संजय वारकड यांनी सिडको परिसरातील रामनगर भागाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. ३० जून २०२६ पासून ८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बीएलओंकडून मतदारांना नाव नोंदणीसाठी आवश्यक फॉर्मचे वाटप व माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. खल्लाळ आणि तहसीलदार वारकड यांनी यादी भाग क्रमांक २०८ मधील मतदारांशी संवाद साधत कामकाजाची पाहणी केली. त्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून बीएलओंना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सूरज स्वामी,...
error: Content is protected !!