महानगरपालिका कामकाजात गती आणा; स्वच्छतेत तडजोड नाही – महापौरांचे निर्देश
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा महापौर कविता संतोष मुळे यांनी १५ एप्रिल २०२६ रोजी घेतला.
यावेळी शहरातील प्रलंबित नागरी कामे वेळेत पूर्ण करण्याचे आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीदरम्यान विविध क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील दैनंदिन कामकाज, प्रलंबित प्रकल्प तसेच स्वच्छता मोहिमेचा आढावा महापौरांसमोर सादर केला. शहरातील नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी कामकाजात गती आणावी आणि स्वच्छतेत सुसूत्रता ठेवावी, असेही महापौरांनी नमूद केले....
