काकीनाडा–हिसार विशेष गाडीला मुदतवाढ; नांदेडमार्गे धावणार
नांदेड | उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाउन ते हिसार दरम्यान धावणाऱ्या “Train on Demand (TOD)” विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे. ही गाडी मुदखेड–नांदेड–पूर्णा–बसमत–हिंगोली–वाशीम–अकोला मार्गे धावणार आहे.
प्रवाशांची वाढती मागणी पाहता गाडी क्रमांक 07717 काकीनाडा टाउन–हिसार TOD विशेष गाडी 28 एप्रिल 2026 रोजी काकीनाडा टाउन स्थानकावरून सकाळी 5.40 वाजता सुटणार असून नांदेड (23.10), पूर्णा (00.40), बसमत (01.10), हिंगोली (02.35), वाशीम (03.55), अकोला (05.45) मार्गे पुढे भुसावळ, वडोदरा, रतलाम आणि चित्तौडगड या स्थानकांवरून प्रवास करत गुरुवारी दुपारी 1.40 वाजता हिसार येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07718 हिसार–काकीनाडा टाउन TOD विशेष गाडी 1 मे 2026 रोजी हिसार येथून दुपारी 2.10 वाजता सुटून रविवारी दुपारी 12.35 वाजता काकीनाडा टा...
