नारीशक्तीच्या सन्मानासाठी हिमायतनगरात शिवसेना महिला आघाडीचे काँग्रेसविरोधी आंदोलन
हिमायतनगर | महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व सहयोगी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहरात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
शहरातील श्री परमेश्वर मंदिरासमोर झालेल्या या आंदोलनात “नारीशक्ती के सन्मान में शिवसेना मैदान में” व “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. शितलताई भांगे पाटील यांनी केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडले, मात्र काँग्रेस व त्यांच्या सहयोगी पक्षांनी त्यास विरोध केल्याने महिलांच्या हक्कांना बाधा पोहोचत आहे. हे विधेयक लवकरात लवकर मंजूर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हे आंदोलन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा संपर्क...
