Tag: काँग्रेस

70 तासांत 5 खून; नांदेडमध्ये भीतीचे वातावरण, काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

70 तासांत 5 खून; नांदेडमध्ये भीतीचे वातावरण, काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राजकारण
नांदेड |  नांदेड शहरात अवघ्या 70 तासांत सलग पाच हत्यांच्या घटनांनी शहर अक्षरशः हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नांदेड काँग्रेस कमिटी आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी Rahul Kardile यांना निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर शहरात अल्पावधीत घडलेल्या या हत्याकांडांमुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षितता वाढली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांच वाढत बळ असा गंभीर चित्र समोर आले आहे. याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ठोस मागण्या निवेदनाद्वारे केल्या असून, यात  अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी, गुन्हेगार टोळ्यांवर कठोर कारवाई, नशाखोरीच्या अड्ड्यांचा बंदोबस्त, शहरात विशेष मोहीम राबवून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे अश्या मागण्या करण्यात आल्या. या निवेदनावेळी का...
जवळगावकरांच्या कार्यनिष्ठेमुळे हिमायतनगरात काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य – राजेश पावडे

जवळगावकरांच्या कार्यनिष्ठेमुळे हिमायतनगरात काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य – राजेश पावडे

राजकारण
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यनिष्ठा, जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण कामामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला आजही अभेद्य राहिला आहे, असा ठाम विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी व्यक्त केला. तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आयोजित ‘सृजन संघटन अभियान’ बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पक्ष निरीक्षक मोहमद अरीफखान, जिल्हा उपाध्यक्ष नागराज सुलगेकर, उपाध्यक्ष तातेराव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी माहूरगड दत्त संस्थानचे महंत मधूसुदनजी भारती यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष पावडे यांचा सत्कार करण्यात आला. पावडे पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या ‘सृजन संघटन अभियान’ अंतर्गत संघटनात्मक बळकटीसाठी विशेष प्रयत्न सुरू असून पक्षश...
देगलूर नाका स्फोट प्रकरणाचा उलगडा करा; काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन

देगलूर नाका स्फोट प्रकरणाचा उलगडा करा; काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन

क्राइम
नांदेड | ईदच्या दिवशी नांदेड शहरातील देगलूर नाका येथील ईदगाह परिसरात मोटर सायकलचा स्फोट होऊन एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेमागे कोणताही घातपाताचा हेतू आहे का, याची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. घटनेला दहा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणताही अधिकृत खुलासा न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी खासदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या निवेदनात, घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करून सत्य तात्काळ जनतेसमोर आणावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे...
error: Content is protected !!