हिमायतनगर शहरातील अनेक ओपन स्पेस गायब..!
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील जमिनीचे प्लाॅट पाडून विक्री करणाऱ्या मालकांनी मुळ लेआऊट मध्ये दाखविलेले रस्ते ओपन स्पेस ही प्लाॅट पाडून त्याची विक्री केली आहे. परिणामी अनेक ओपन स्पेस आता गायब झाले आहेत. या बाबतीत संबंधित प्रशासनाची उदासीनता अश्या प्रकारच्या गैर प्रकारांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. रस्ते ओपन स्पेस दाखवून नगररचना कार्यालयाकडून लेआऊट मंजूर करून घ्यायचे आणी नंतर परस्पर फेरबदल करून रस्ते आणी ओपन स्पेस ची परस्पर विक्री करण्याचा गोरखधंदा शहरात मोठ्याप्रमाणात फोफावत आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे यांनी केली.
हिमायतनगर शहराची हद्दवाढ होवून आजूबाजूचा खुप मोठा भाग हा नगरपंचायतीच्या हद्दीत आलेला आहे. व तसेच शहराचे विस्तारीकरण ही वेगाने सुरू आहे. नवीन वसाहतीत अनेकांनी जमीनी विकत घेऊन त्याचे प्लाॅट पाडून ते विक्री...
