ऑपरेशन ‘फ्लश आऊट’ : नांदेड शहरात मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन
नांदेड| शहरातील चोरी व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 ते 7 एप्रिल पहाटे 2 वाजेपर्यंत हे ऑपरेशन पार पडले.
या विशेष मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच नांदेड शहर व ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. नांदेड ग्रामीण , इतवारा, वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ यांसह कुंटूर, रामतीर्थ, सोनखेड, उस्माननगर, लिंबगाव आदी ठाण्यांनी संयुक्त कारवाई केली.
ऑपरेशनदरम्यान सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपी, अवैध शस्त्र बाळगणारे तसेच मालमत्ते विरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. अनेक संशयितांची चौकशी करून काह...
