Tag: ऑपरेशन डिग्निटी

“ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत आरपीएफची धडाकेबाज कारवाई

“ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत आरपीएफची धडाकेबाज कारवाई

महाराष्ट्र, स्थानिक
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे सुरक्षा बल (RPF) तर्फे “ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सन्मान जपण्याचे उल्लेखनीय कार्य सातत्याने सुरू असून विविध घटनांमध्ये तात्काळ आणि संवेदनशील कारवाई करत गरजू प्रवाशांना मदतीचा हात दिला जात आहे. दि. २७ मार्च रोजी दुपारी सुमारे २:३० वाजता पुर्णा रेल्वे स्थानकावर एक युवती घरातून पळून आल्याची माहिती महिला कॉन्स्टेबल गुड्डीबाई मीणा यांना मिळाली. तत्काळ कारवाई करत त्यांनी युवतीला सुरक्षितपणे आरपीएफ पोस्टवर आणून चौकशी केली. संबंधित युवती ही मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील असल्याचे समोर आले. पुढील प्रक्रिया म्हणून तिला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून नंतर परभणी येथील ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या स्वाधीन करण्यात आले. याच दिवशी आणखी एका घटनेत, पंजाबमधील बठिंडा येथील मानसिक तणावाखालील महिला नांदेड स्थानकावरून बेप...
error: Content is protected !!