Tag: एसपी अविनाश कुमार

गुन्हेगारांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका; एसपी अविनाश कुमारांचा कडक इशारा

गुन्हेगारांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका; एसपी अविनाश कुमारांचा कडक इशारा

क्राइम
नांदेड (प्रतिनिधी) गुन्हेगारांना सोशल मीडियावर सहानुभूती दर्शवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिला आहे. अलीकडील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर काही व्यक्तींकडून आरोपींच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना अविनाश कुमार यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “गुन्हेगार हा कोणाचा भाऊ किंवा नातेवाईक नसतो. गुन्हा करणाऱ्याला कोणत्याही प्रकारे समर्थन देणे चुकीचे असून समाजासाठी घातक आहे.” ते पुढे म्हणाले की, सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट टाकून गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांनी अफवा, दिशाभूल करणारी माहिती किंवा भावनिक पोस्ट शेअर करण्यापासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. पोलीस प्रशासन गुन्हेगारीवर नियंत्रण मिळव...
error: Content is protected !!