शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; २५,९०० रुपयांचा गांजा जप्त, एकाला अटक
नांदेड (प्रतिनिधी) शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकत अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका इसमावर कारवाई करून २५,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी गु.र.नं. १७२/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायदा १९८५ (कलम 8(क), 20) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २१ एप्रिल रोजी सायंकाळी भाजी मंडई, दातार चौक परिसरात करण्यात आली.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेजने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
छाप्यामध्ये आरोपी मोहम्मद मुजाहीद मोहम्मद इशरत (वय २०, रा. भाजी मंडई, दातार चौक, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ किलो २०० ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा (किंमत अंदाजे २५,००० रुपये) तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक इरफान युनुस सय्यद व त्यांच्या पथकाने ही कारवा...
