एकल महिला धोरणासाठी अभिप्राय नोंदवा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नांदेडमध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा; जिल्ह्यात 99,789 एकल महिलांची नोंद
नांदेड | राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी स्वतंत्र 'एकल महिला धोरण' तयार करण्यात येत असून, हे धोरण अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना व अभिप्राय लवकरात लवकर नोंदवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित घटक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार 99 हजार 789 एकल महिलांची नोंद झाली आहे. या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि सुविधा उपलब्ध क...
