उष्णतेच्या लाटेत वानरांचाही सावलीकडे कल; निसर्ग देतोय शांततेचा संदेश!
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुका परिसरात सध्या तीव्र उष्णतेची लाट उसळली असून तापमान तब्बल 44 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. या उष्णतेच्या झळा फक्त मानवांनाच नव्हे तर प्राणीमात्रांनाही सहन कराव्या लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
https://www.youtube.com/shorts/CE0gVHIVGpA
शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात एक वेगळे आणि विचार करायला लावणारे दृश्य समोर आले आहे. मंदिराजवळील लिंबाच्या झाडाखाली वानरांचा एक समूह उन्हापासून बचाव करण्यासाठी शांतपणे विसावा घेताना दिसला. मानवाचे पूर्वज मानले जाणारे हे वानरही कडक उन्हापासून वाचण्यासाठी सावलीचा आधार घेत असल्याने निसर्गाशी जुळवून घेण्याचा सुंदर संदेश देत आहेत.
“बाहेर ऊन फार आहे… दुपारी सावलीतच आराम करा,” असा जणू संदेशच ही वानरांची ...
