Tag: उपोषणाचा इशारा

हिमायतनगरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेच्या मागणीवरून उपोषणाचा इशारा

हिमायतनगरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेच्या मागणीवरून उपोषणाचा इशारा

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या मागणीसाठी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी नगरपंचायत प्रशासनास निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी दि. १७ फेब्रुवारी व ३१ मार्च २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी उपनगराध्यक्ष व प्रशासनाने १५ एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापही पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने वारंवार आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप करत, दि. २१ एप्रिल २०२६ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा...
error: Content is protected !!