Tag: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा राज्यव्यापी शुभारंभ

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा राज्यव्यापी शुभारंभ

महाराष्ट्र
मुंबई| जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ग्रामीण महाराष्ट्राचा आरोग्यदायी चेहरा घडविण्यासाठी राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. अभियानाविषयी सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. यावेळी अभियानाची माहिती देणाऱ्या व्हिडिओ व पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे. स्वच्छता, शुद्ध प...
लोह्यात भव्य शेतकरी मेळावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

लोह्यात भव्य शेतकरी मेळावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

राजकारण
नांदेड/लोहा | नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकरी व महिला कल्याणाच्या विविध योजनांबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडत मोठ्या घोषणा केल्या. या मेळाव्याला जिल्ह्यासह आसपासच्या भागातून शेतकरी, महिला व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे माजी आमदार व ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. या वेळी त्यांचा “महाराष्ट्राचे शेतकरी नेते” असा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. विशेषतः “लाडकी बहिण” योजनेचा उल्लेख करत ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे त्यांनी ठ...
पाच निवडणुकांत शिवसेनेला टक्कर देणारे शंकरअण्णा धोंडगे आता भगव्या वाटेवर

पाच निवडणुकांत शिवसेनेला टक्कर देणारे शंकरअण्णा धोंडगे आता भगव्या वाटेवर

राजकारण
नांदेड| राजकारणात बदल हा शाश्वत असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तब्बल पाच विधानसभा निवडणुकांत शिवसेनेविरुद्ध लढत देणारे ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे आता शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. २९ मार्च रोजी लोहा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधणार आहेत. नव्वदच्या दशकात “भीक नको, हवे घामाचे दाम” या घोषणेने राज्यभर आंदोलने उभारणारे शंकरअण्णा धोंडगे हे शरद जोशी (Sharad Joshi) यांच्या विचारातून घडलेले नेते. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर संघर्ष करत अनेकदा जेलही भोगली. प्रभावी वक्तृत्व आणि शेतकऱ्यांशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांनी मोठा कार्यकर्ता वर्ग तयार केला. १९९५ पासून कंधार विधानसभा मतदारसंघात त्यांनी अपक्ष आणि नंतर विविध पक्षांतून निवडणुका लढवत शिवसेनेशी थेट मुकाबला केला. त्या क...
error: Content is protected !!