Tag: उत्कृष्ट कार्याबद्दल

उत्कृष्ट कार्याबद्दल पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा सत्कार

उत्कृष्ट कार्याबद्दल पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा सत्कार

शेती
नांदेड | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत प्रभावी प्रशिक्षणाचे आयोजन करून पशुपालकांना मार्गदर्शन करणाऱ्या तसेच दुग्धविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. नायगाव येथील डॉ. गौतम खिल्लारे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत पाच दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भोकर येथील डॉ. संजय रोळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आणि डॉ. अविनाश बुन्नावार, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी एक दिवसीय प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश खिल्लारे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. ...
error: Content is protected !!