Tag: आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

लोहा हरित शहरासाठी १ लाख ५१ हजार वृक्षारोपणाची लोकचळवळ उभी राहणार : आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

लोहा हरित शहरासाठी १ लाख ५१ हजार वृक्षारोपणाची लोकचळवळ उभी राहणार : आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

राजकारण
मतभेद विसरून प्रत्येक नागरिकाने ‘एक घर-एक झाड’ संकल्प स्वीकारावा; शहर हरित करण्याचे आवाहन लोहा | लोहा शहराला हरित, स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी तब्बल १ लाख ५१ हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला असून, ही केवळ सरकारी मोहीम न राहता लोकचळवळ बनावी, असे आवाहन विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष तथा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नागरिकांनी पुढाकार घेतल्यास येत्या काही वर्षांत लोहा शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोहा येथील बाळाजी पाटील पवार मंगल कार्यालयात युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, नगरसेवक श्याम पाटील व कुटुंबीयांच्या वतीने आयोजित ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, मोहनअण्णा हंबर्डे, सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण प...
महाराजस्व शिबिरातून जनतेच्या अडीअडचणींचा निपटारा – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

महाराजस्व शिबिरातून जनतेच्या अडीअडचणींचा निपटारा – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

राजकारण
लोहा| महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी धोरणांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिरांमुळे नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा जागीच निपटारा होत असून अशा शिबिरांचा नागरिकांना मोठा फायदा होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. तालुक्यातील कापशी (बु.) येथे शुक्रवारी (दि. १० एप्रिल) हे शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेने तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कंधार-दोनूर अनन्या रेड्डी आणि तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर होते. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासन अधिक गतिमान होण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली. नागरिकांच्या अडीअडचणींचे तात्काळ निराकरण होत असल्याने वेळ व श्रम वाचतात...
लोह्यात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांब रांगा; जानापुरीत गॅस सिलेंडरसाठी गर्दी

लोह्यात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांब रांगा; जानापुरीत गॅस सिलेंडरसाठी गर्दी

क्राइम, स्थानिक
लोहा| जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत असतानाही अफवांमुळे लोहा शहरात पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंधनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. दुचाकी, चारचाकी, क्रेन, जेसीबी, हायवा आणि इतर वाहनांनी सकाळपासूनच पेट्रोलपंपांवर रांगा लावल्या होत्या. इंधन तुटवडा होईल या भीतीपोटी अनेकांनी “टँक फुल” करण्याकडे कल दर्शविला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तरीही काही भागात भीतीचे वातावरण असल्याचे दिसून आले. जानापुरीत गॅस सिलेंडरसाठी झुंबड दरम्यान, तालुक्यातील जानापुरी येथे गॅस गोडाऊनसमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी उन्हाता...
error: Content is protected !!